Saturday, January 3, 2026

तु राख फुले




तु राख फुले सजनी
गंध हळूने विरतो
जिव जणू की व्याकुळ 
अज्ञातासाठी झुरतो

असते ठायी ओढ
संयत तरीही राहतो
देव गाभा-यातला
दूर निश्चल पाहतो

भक्तीचे कसले कल्लोळ
अंतरात खोल फिरती
नात्याची विण हळवी
नाजूक.......थरथरती


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

 
 

No comments:

Post a Comment

अंतरात...