सोसावी लागते कळ
आणीक असह्य वेदना
कविता अशी उरातली
ऋषीकुळाची साधना!
लागते अनाम टाळी
उरात अनंत दाटतो
भक्तपंथी हाकेस जणू
भगवंत मुक्याने भेटतो!
गतजन्माची हाक ही
शब्दांना माझ्या पावते
जणू जात्यावरची जनी
ओवीला ओवी लावते!
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment