Saturday, January 3, 2026

मातीतील रूजवा



मातीत उगवती फुले आणी 
मातीत फुले मिसळती
फुल जणू मातीची
कविता एक उसळती

गंध भारन्या येते आणी 
होऊन जाते रिती
कवितेच्या अंतःकरणाला
मातीची सद्गती

ऋण तुझ्या गंधाचे
मातीत रुजले आहे
हे अहेवपण वेडे
एकलेच सजले आहे  


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

जातं

जात्यावर म्हण सखे काळजाचे गाणे टाक एकामाग एक स्वप्न भरून मूठीने जोड एक एक शब्द  पिठ हळूने पडेल घामभिजला पदर मुक्याने रडेल सूपातले सारे जरी ...