उणावते माझेपण
कवितेचा कोंडमारा
तोलू कसा हृदयी
उमाळ्याच्या भारा
देवू नकोस शपथा
शब्दांना जाग नाही
मरत्या कवितेस माझ्या
कोणाचा राग नाही
कबरीची तोबा गर्दी
कवितेच्या माझ्या आत
शब्द माझे मरणासन्न
भाव मूक..... क्लांत
₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment