Thursday, January 15, 2026

फरारी




मी आकाश कुठे 
मागतो सारे कवेत
खिडकी पल्याडचे थोडे
कवडसे हवेत

असे अनाहूत तूला
वा-यासवे जायचे होते
माझ्या खिडकीपाशी ढगा 
तू यायचे नव्हते 

दिलेस जिवाला पंख
आणी शब्दांना भरारी
ऋतूसंगाचा शब्द मोडून 
तू झालास रे फरारी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

स्वप्नभंगाचा यमक

माझ्या कवितेचा सखे तू नको तोडू तंतू आणी नको तुझ्या  मनी किंतू परंतू ही भावनेची मंत्रधून  मी रोज करे धावा ही लेप संजिवनी शांतावतो गर्त घावा स...