Sunday, January 4, 2026

फकीर ईश्वर





फकिर गातो गाणे
हळूच निघते खपली
इकतारी सूर तळाचा
शब्दांची त्याची डफली

लागतो मधेच नाचू
मधेच हुंदका फुटतो
आत्म्यातला ईश्वर
तिळातिळाने तुटतो

तुटल्या इश्वराला तो 
व्याकुळ वेचून घेतो
रोमरोमी धारून धूळ
फकीर ईश्वर होतो.

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...