Friday, January 30, 2026

हाकेला निवारा



नको होवूस पाठमोरी
दे हाकेला निवारा 
चाड नसेल भक्तीची
काय कामाचा देव्हारा!

पाणी हरपेल बाई !
दे दोहो बाजूस तट
नको करूस नदीची
सागराशी ताटातूट!

किती बोलशील उणे
मूक संकेतांचे शब्द 
देव नसता अंतरी
नसे अभंगा प्रारब्ध!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com
 



No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...