Saturday, January 3, 2026

भिरभिर




माझ्या शब्दांची भिरभिरी
फिरून तमात हरवे
अंधा-या या रातीला
समजून घेते बरवे

ती नित्य डोंगरा येते
आणी माघारा फिरते
सांज अशी गुंग 
रातीत हळूने विरते

शब्द थव्याचा माझ्या
रोज हरवतो रस्ता
कवितेचा प्रवास असा
चालतो मुक अहिस्ता  


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

 

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...