Wednesday, January 7, 2026

क्षमा




मी !
किती आवेगाने
माझ्या जखमा विसरून
शोधत होतो ते लोक
ज्यांनी ख्रिस्ताच्या 
खांद्यावर दिला होता
तीक्ष्ण कठोर
काटेरी सुळ!

मला
त्याच
गर्दीत तूझा 
चेहरा दिसला..अन्
मी सर्वांना क्षमा केले!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com







No comments:

Post a Comment

अंतरात...