Sunday, January 25, 2026

उमाठा




कधीच कोसळलेली
झाडाची गंधीत काया
जणू भाव फुलांचा व्याकुळ 
आला ओंजळ शोधाया

कसला उमाठा त्यांच्या
आला असेल भेटी?
करून गेला फुलांची
फांदीशी ताटातूटी!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




No comments:

Post a Comment

अंतरात...