Saturday, January 3, 2026

बिज धारिले




मी बिज धारीले तुझे
झाडातून उगवाया
मातीला द्यावी हरखून
तू काळजातली माया

धार हवेला येते
पाते हलते रानी
हे भय उन्मळीचे
जोखून घेते पाणी

फांदीवर डवरे फूल
गंध आसमंत भारे
प्रितीने मोहीत होते
रोरावणारे वारे

हे झाड पारिजाताचे
स्वर्गाला त्याची आस
प्रितीचा गंध तुझ्या की
त्याला तुझा सुवास

येतील किती ऋतू की
झाडाला कसले भय?
त्याच्या बिजअंतरा
असता तुझी सय......


कुशिस आले मला भेटण्या
तुझे अनावर हात नभाचे
गळून पडले बंधन आपसूक
अवखळ थबकत्या  ..मुभांचे....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...