Thursday, January 15, 2026

पडवीला




पडवीला चंद्र बाधतो
अंधार मंतरलेला
अलगद अंगभर घे ना 
तू कृष्णमिठीचा शेला

हळूच पायरवाचे 
हे निनाद कसले येती?
सूर बासरी हळवे
जेंव्हा वाजत होती 

ही मनामनाची गाणी
डोंगरी शिळ घूमते
रात मंतरलेली
पायतळाला शिणते

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...