Saturday, January 3, 2026

क्लांत कृष्ण




मी बसलो आहे येथे
क्लांत कृष्ण जणू
कुरूक्षेत्री घुमेल कसा
वेणूचा रूनझूनू?  

हे अंतरीचे युद्ध 
दुःशासन अजूनी हसतो
पांचालीच्या पदरासाठी 
रण खुणावत असतो

कशास पाहू धर्म 
कशास आणीक निती
पांचालीस अर्पून द्यावी
अधर्मी थरारती भिती

भेदून द्यावे सारे आणी 
दुःशासनी ते हात
बुडवून द्यावा अधर्म 
हृदयीच्या रणांगणात 

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


 




No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...