Saturday, January 24, 2026

कर्णरथ






भिरकवून उल्का नभी
चांदण्याचे मळवट भरले
चंद्रलयीच्या मुहूर्ती
अंतरी काय थरथरले?

सांज लगबगी वेळ
तू साधून घेतली हाक
आठवण होऊन बसली
कर्णरथाचे रुतले चाक!


₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com

No comments:

Post a Comment

अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...