Monday, January 26, 2026

कांचनमृगी चोळी!



बाई! नको मागू मला
कांचनमृगाची चोळी
कोण यईल असूर 
पसरेल झोळी

नको देवू मला
तूझ्या हाकांचे आभास
तूला वाटते मी भोगावा
चौदा वर्षाचा वनवास?

नको रामायण आणी
ती नको अग्नीपरिक्षा
रहा आनंदे पर्णकुटी
नको वाढू कुणा भिक्षा!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com


No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...